कारच्या किल्ल्यांची डिलीव्हरी ड्रोनने देणार चीनी कंपनी गिली


फोटो सौजन्य भास्कर
करोना विषाणू मुळे एकमेकांच्या संपर्कात येण्यास अटकाव केला जात असल्याचा परिणाम उद्योग व्यवसायावरही पडला आहे. मात्र गिली या चीनी कार उत्पादक कंपनीने त्यावर तोडगा काढताना कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या कारची किल्ली घराच्या दारात अथवा बाल्कनीत ड्रोनने देण्याची सेवा सुरु केली असून कारची डिलीव्हरी ट्रकने केली जाणार आहे. फेब्रुवारीच्या १० तारखेपासून कंपनीने ऑनलाईन सेल्स सिस्टीम सुरु केली असून त्यात ऑनलाईन कार बुकिंग, डिझाईन मॉडीफिकेशन, ऑनलाईन फायनान्स, इन्शुरन्स सुविधा दिली गेली आहे.

कारची ग्राहकांना होम डिलीव्हरी दिली जाणार आहे त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहक एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत असे कंपनीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या दीड महिन्यात कंपनीकडे १० हजार गाड्यांची मागणी नोंदविली गेली आहे. कंपनीने १.१० हजार ऑर्डरचे लक्ष्य ठेवले असल्याचे समजते.

या प्रकारे करोना संक्रमणाशिवाय कार डिलीव्हरी देण्यासाठी कंपनीने ७ अब्ज ८५ कोटींचा फंड तयार केला आहे. यात गाड्याची सुरक्षितता, मजबुती राखली जाईलच पण त्याचबरोबर कार्स स्वच्छ, आणि कार मध्ये अँटीबॅक्टेरीअल, अँटी जर्म फिचर्स दिली गेली आहेत. कंपनीचे उपाध्यक्ष व्हिक्टर यांग यांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Comment