चीनने लपविला करोना बळींचा आकडा?


फोटो सौजन्य इपोक टाईम्स
जगभरातील १८० हून अधिक देशात पसरलेल्या करोना व्हायरसने चीन मधून काढता पाय घेतल्याच्या बातम्या येत असतानाच वुहान मधून पसरलेल्या या विषाणूने चीन मध्ये जे बळी घेतले त्याचा फसवा आकडा सरकारने जगासमोर ठेवल्याचा आरोप केला जात आहे. चीन मध्ये ३२७० लोकांचा बळी गेला असून ८१०९३ लोकांना त्याचा संसर्ग झाल्याचे म्हटले होते.

मात्र चीनने मृतांचा हा खोटा आकडा दिल्याचा आरोप काही चीनी नागरिकच करत आहेत. त्यासाठी काही व्हिडीओ, कागदपत्रे आणि सरकारी आकडेवारी शेअर केली जात आहे. चीन मध्ये मिडीया आणि प्रसार माध्यमे सरकारी नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवर चीनी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चीन मध्ये करोनामुळे लाखो लोकांना मृत्यू आल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यासाठी लक्षणीय रित्या घटलेले मोबाईल युजर्सचे प्रमाण पुढे केले जात आहे.

चीन मध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या तुलनेत मोबाईल युजरची संख्या दोन कोटींनी कमी झाली आहे तर लँडलाईन युजरची संख्या सुमारे १ कोटीने घटली आहे. मोबाईल युजर्सचे प्रमाण या काळात १.६० अब्जावरून १.५८ अब्जावर आले आहे तर लँडलाईन युजरचे प्रमाण १९.८३ कोटींवरून १८.९९ कोटींवर आले आहे.

अमेरिकन संचालित मिडीया इपोक टाईम्सने या संदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार गेल्या डिसेंबरमध्ये चीनमध्ये सेलफोनसाठी फेशियल स्कॅन बंधनकारक करण्यात आला होता. त्यावेळी चीन मधील ३ प्रमुख मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डेटानुसार युजरची संख्या वाढली होती. प्रमुख कंपनी चायना मोबाईलचा चीनी मोबाईल सेवा कंपन्यात बाजारातील हिस्सा ६० टक्के असून ती प्रमुख कंपनी आहे. त्यानीही डिसेंबरमध्ये युजरची संख्या ३०.७३ लाखाने वाढल्याचे जाहीर केले होते. मात्र जानेवारीत हे प्रमाण ८.६२ लाख तर फेब्रुवारीत ७२ लाखानी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment