वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटचा स्पीड गडबडला

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. यामुळे इंटरनेटचा वेग देखील कमी झाला आहे. दिल्ली-एनसीआर भागात कालपासून इंटरनेटचा वेग कमी झाला आहे.

सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना काम पुर्ण करण्यासाठी इंटरनेटच मुख्य साधन आहे. त्यामुळे इंटरनेटवर सर्वाधिक परिणाम पाहण्यास मिळत आहे.

खाजगी कंपन्यांचे कर्मचारी घरून काम करत असल्याने देखील इंटरनेटवर लोड वाढत आहे. देशभरातील माहिती मिळवण्यासाठी युजर्स देखील मोबाईल स्ट्रिमिंग आणि सर्फिंग करत आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शहर लॉक डाउन करम्यात आली आहेत. तर काही कंपन्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे, त्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. याचा परिणाम आता इंटरनेटवर पाहण्यास मिळत आहे.

Leave a Comment