इंस्टाग्राम युजर्ससाठी लवकरच आणणार खास फीचर

इंस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी खास फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फीचरचे नाव डिसअपेअरिंग मेसेज असे असून, याद्वारे अ‍ॅपमधील मेसेज आपोआप डिलीट होतील.

कंपनीने अद्याप या फीचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप देखील या फीचरवर काम करत असून, बिटा व्हर्जनवर याचे टेस्टिंग सुरू आहे.

कंपनीचे इंजिनिअरिंग विशेषज्ञ जेन वाँगने या खास फीचरबाबत ट्विट केले आहे. जेम्स वाँगने ट्विटमध्ये सांगितले की, आम्ही एक खास फीचर लाँच करणार आहोत, ज्यात काही वेळानंतर मेसेज आपोआप डिलीट होतील. ट्विटर देखील या फीचरवर काम करत असून, ट्विटरवर 24 तासानंतर मेसेज आपोआप डिलीट होतील.

युजर्स आपले मेसेज डिलीट करण्यासाठी निश्चित वेळ निर्धारित करू शकतात. या वेळेनंतर सर्व मेसेज आपोआप डिलीट होतील.

Leave a Comment