इंडियन ऑइलमध्ये दहावी ते पदवीधरांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी

इंडियन ऑइलच्या मार्केटिंग डिव्हिजनने टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 404 पदांसाठी भरती होणार असून, यात जनरल 164, ईडब्ल्यूएस 40, एससी 64, एसटी 38, ओबीसी 82 आणि पीडब्ल्यूबीडीसाठी 16 पदांचा समावेश आहे.

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्जाची अंतिम तारीख 10 एप्रिल 2020 आहे. अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्याची अंतिम तारीख 14 एप्रिल 2020 असून, लेखी परिक्षेची संभावित तारीख 19 एप्रिल 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता –

या पदांकरिता 10वी, 12वी, आयटीआय आणि पदवीधर अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.

वय –

इच्छुक उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल वय 40 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

परिक्षा –

उमेदवारांची 100 मार्कांची लेखी परिक्षा घेतली जाईल. पास झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाईल.

अधिक माहिती व अर्जासाठी इच्छुक व पात्र उमेदवार इंडियन ऑइलची अधिकृत वेबसाईट iocl.com ला भेट देऊ शकतात.

Leave a Comment