प्रथमच शेअर बाजार वर्क फ्रॉम होम चालणार


फोटो सौजन्य लाईव्हमिंट
करोनामुळे महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराचे काम इतिहासात प्रथमच वर्क फ्रॉम होम पद्धतीने चालविले जाणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे स्टॉक एक्स्चेंजने शुक्रवारी जारी केली आहेत. त्यानुसार ब्रोकरेज फर्मनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम साठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

ईटी मार्केट्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्टॉक एक्स्चेंजच्या मार्गदर्शक तत्वांमुळे ब्रोकर क्लायंट करता ट्रेड करू शकणार आहेत. एएनएमआयचे अध्यक्ष विजय भूषण म्हणाले, क्लायंटना कोणताही त्रास होऊ नये याच काळजी ब्रोकर फर्म घेणार आहेत. गुंतवणूक दाराची प्रत्येक मागणी वेळेवर नोंदविली जाईल याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे. आमचे कर्मचारी घरून काम करताना त्याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होणार नाही याबाबत दक्षता घेणार आहेत. शेअर बाजाराच्या इतिहासात कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एएनएमआयचे ९०० ब्रोकर आहेत आणि ग्राहकाची प्रत्येक मागणी वेळेवर प्लेस करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत असेही भूषण यांनी सांगितले.

Leave a Comment