जर्मनी चान्सलर अन्जेला मर्केल क्वारंटाइन


फोटो सौजन्य लीडरन्यूजपेपर
जर्मनीच्या चान्सलर अन्जेला मर्केल यांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अन्जेला याना लस देणाऱ्या डॉक्टरच्या कोविड १९ च्या चाचण्या पोझिटिव्ह आल्याने मर्केल याना क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे मर्केल करोना पासून बचाव कसा केला जावा यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन बाहेर येत असताना त्यांना न्युमोकोकलची लस देणाऱ्या डॉक्टरची करोना टेस्ट पोझिटिव्ह आल्याचे समजले. तेव्हा त्यांनी ताबडतोब क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आणि आता त्या घरूनच काम करणार आहेत. मर्केल ६५ वर्षांच्या असुन त्यांच्या आवश्यक त्या साऱ्या चाचण्या घेतल्या जाणार असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

जर्मनीत करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने दोन आठवड्यापूर्वीच मर्केल यांनी देशात सोशल डीस्टन्सिंग लागू केले आहे. त्यानुसार घराबाहेरच्या फक्त एकाच माणसाशी संपर्काची परवानगी दिली गेली आहे. त्याचप्रमाणे बार्बर शॉप, मसाज पार्लर अशी दुकाने बंद केली गेली आहेत. लोकांनी दीड मीटर अंतर ठेऊन एकमेकांशी बोलण्याचे आदेश दिले गेले आहेत. जर्मनी मध्ये करोना संक्रमितांची संख्या २४८०६ वर गेली असून त्यातील २६६ लोक बरे झाले आहेत. ९३ लोक मरण पावले आहेत.

Leave a Comment