जपानमध्ये पोहोचली ऑलिम्पिक ज्योत


फोटो सौजन्य भास्कर
टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकलाव्या यासाठी विविध ऑलिम्पिक संघटना आग्रही असतानाच ग्रीसहून निघालेली ऑलिम्पिक ज्योत जपानमध्ये पोहोचली आहे. शुक्रवारी चार्टर्ड फ्लाईटने ही ज्योत आणली गेली आणि शनिवारी जपानच्या मियागी मधील सेंडई स्टेशनवर ज्योत आली तेव्हा ती पाहण्यासाठी ५० हजार लोक जमले होते. ज्योत पाहण्यासाठीची रांग अर्धा किलोमीटर होती. गर्दी पाहून जपान ऑलिम्पिक कमिटी चिंतीत झाल्याचे समजते. ज्योतीचे स्वागत टोक्यो ऑलिम्पिक ऑर्गनायझेशन कमिटी प्रमुख योशिरो मोरी यांनी केले.

वर्ल्ड अॅथलेटिक फेडरेशनचे अध्यक्ष सबेस्टीयन को यांनी शनिवारी टोक्यो ऑलिम्पिक बाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे सांगितले. ते म्हणाले, खेळाडूंची सुरक्षा अधिक महत्वाची असून त्यांच्या सुरक्षेची किंमत मोजून हे गेम्स खेळविता येणार नाहीत.

दरम्यान जपान ऑलिम्पिक कमिटीने ऑलिम्पिक ज्योतीचा रिले २६ मार्च पासून फुकुशिमा येथून सुरु केला जाईल असे कळविले असून ही ज्योत १२१ दिवसांचा प्रवास जपानच्या महत्वाच्या शहरातून पूर्ण करून टोक्यो मध्ये पोहोचणार आहे. फुकुशिमा येथील अणुप्रकल्पाला २०११ च्या त्सुनामीचा मोठा फटाका बसला होता आणि येथे रेडिएशन मोठ्या प्रमाणावर झाले होते. आता येथील परिस्थिती पूर्व पदावर आली असल्याचे दाखविण्यासाठी या शहरापासून टॉर्च रिले सुरु केला जाणार असल्याचे समजते.

Leave a Comment