यूरोपियन यूनियनच्या आग्रहानंतर यूट्यूबने देखील नेटफ्लिक्सप्रमाणेच हाय डेफिनेशन (एचडी) आणि फूलएचडीच्या ऐवजी स्टँडर्ड डेफिनेशन (एसडी) क्वॉलिटी व्हिडीओ दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सध्या केवळ यूरोप पुरताच मर्यादित आहे.
कोरोना : आता यूट्यूबही बंद करणार एचडी व्हिडीओ
या निर्णयावर कंपनीचे प्रवक्ते म्हणाले की, युजर्सला एसडी क्वॉलिटी व्हिडीओ दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यांना चांगल्या क्वॉलिटी व्हिडीओ पाहण्यास मिळतील.
सध्या कोरोनामुळे जगभराता शहर लॉकडाउन असल्याने लोक घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत लोक ऑनलाईन व्हिडीओ पाहून आणि गेम खेळून वेळ घालवत आहेत. याच पार्श्वभुमीवर यूरोपियन यूनियनने व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सला हाय डिफिनेशन क्वॉलिटी व्हिडीओ दाखवणे बंद करावे, अन्यथा इंटरनेट आउटेजची समस्या निर्माण होईल.
यानंतर नेटफ्लिक्सने एचडी व्हिडीओ बंद केले असून, आता युट्यूबने देखील निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप अॅमेझॉन प्राईमकडून यावर काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.