… म्हणून ट्विटरने हटवला रजनीकांतचा व्हिडीओ

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी नागरिकांना काही आवाहन केले होते. याचे समर्थन करणारा अभिनेता रजनीकांतचा व्हिडीओ ट्विटरने हटवला आहे. या संदर्भात माहिती समोर आल्यानंतर भारतात ट्विटरवर #ShameOnTwitterIndia ट्रेंड होत आहे.

रजनीकांतने शनिवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात लोकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. रजनीकांतने व्हिडीओमध्ये म्हटले की, जनता कर्फ्यूचे पालन केल्याने इटली सारखी परिस्थिती होणार नाही व आपण कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याला टाळू शकू.

मात्र ट्विटरने हा व्हिडीओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे. ट्विटरच्या नियमांची माहिती असणाऱ्या तज्ञांनुसार, या व्हिडीओमध्ये चुकीची माहिती दिल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याची शक्यता आहे. व्हिडीओमध्ये एका ठिकाणी कोरोना व्हायरस केवळ 14 तास जिंवत असतो, असे सांगण्यात आले आहे. या चुकीच्या माहितीमुळे ट्विटरकडून हे पाऊल उचण्यात आल्याची शक्यता आहे.

व्हिडीओ काढून टाकल्याने रजनीकांतचे चाहते नाराज झाले आहेत. युजर्स ट्विटरकडे या संदर्भात स्पष्टीकरण मागत आहेत.

Leave a Comment