शहीद दिन : देशासाठी हसत हसत फासावर गेलेले क्रांतिकारक

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले आहे. या सर्वांमध्ये शहीद भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे बलिदान कधीच विसरण्यासारखे नाही.

23 मार्च 1931 रोजी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली, म्हणून 23 मार्च रोजीदेखील शहीद दिन देखील पाळला जातो. हा दिवस पाळून या हौतात्म्यांच्या त्यागाला सलाम केला जातो.

इंग्रजांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात सर्वात प्रथम भगत सिंह यांनी सांडर्सची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर पब्लिक सेफ्टी आणि ट्रेड डिस्ट्रिब्यूट बिलाच्या विरोधात सेंट्रल अ‍ॅसेंबलीमध्ये बॉम्ब फेकला. या घटनेंनतर त्यांना अटक करण्यात आले व 23 मार्च 1931 ला इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती.

या व्यतिरिक्त वेगवेगळ्या दिनी देखील शहीद दिन पाळला जातो. 30 जानेवारीला नथूराम गोडसेने महात्मा गांधीची हत्या केली होती, त्यामुळे हा दिवस देखील शहीद दिन म्हणून पाळला जातो. राणी लक्ष्मीबाईंच्या जन्मदिनानिमित्ताने 19 नोव्हेंबर देखील शहीद दिवस म्हणून पाळला जातो.

Leave a Comment