कारागृहाचे नियम मोडण्यात माहिर होते निर्भयाचे दोषी

निर्भयाच्या चारही दोषींना 20 मार्चला फाशी देण्यात आली. मात्र तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनुसार, चारही दोषी वारंवार कारागृहातील नियम मोडत असे. सर्वाधिक नियम विनय शर्माने मोडले होते, ज्यामुळे त्याला 11 वेळा शिक्षा देण्यात आली होती.

तुरूंगातील नियम तोडल्याने पवन गुप्ताला 8, मुकेश सिंहला 3 आणि अक्षय ठाकूरला एक वेळा शिक्षा देण्यात आली होती. या दोषींनी तोडलेल्या नियमांमध्ये कुटुंबाशी भेटण्यासाठी असलेली वेळ मर्यादित करणे आणि बॅरक बदलण्यावरून भांडण करणे, या गोष्टींचा समावेश होता.

2015 मध्ये विनयने एक वर्षीय बॅचलर डिग्री प्रोग्राममध्ये अडमिशन घेतले होते, मात्र ते त्याने पुर्ण केले नाही. यानंतर 2016 मध्ये मुकेश, पवन आणि अक्षयने 10वीमध्ये अडमिशन केले होते. त्यांनी परिक्षा देखील दिली मात्र ते पास झाले नाही.

जेल अधिकाऱ्यांनुसार, विनयने तुरूंगात 39 हजार रुपये कमवले. तर अक्षयने सर्वाधिक 69 हजार रुपये, पवनने 29 हजार रुपये कमवले. मुकेश कामापासून लांब असल्याने त्याने काहीही कमाई केली नाही. कारागृहात कैद्यांना रोजंदारीवर काम दिले जाते व जी कमाई होईल ती त्यांच्या कुटुंबाला दिली जाते. अक्षय पीठ दळणे आणि कपडे शिवण्याचे काम करत असे. पवन कारागृहातील कँटिनमध्ये काम करायचा, तर विनय तेथेच सहाय्यक म्हणून काम करत असे.

Leave a Comment