गुगलने अँड्राईड गो युजर्ससाठी खास फोटोग्राफी अ‍ॅप

गुगलने आपल्या अँड्राईड गो युजर्ससाठी कॅमेरा गो अ‍ॅप लाँच केले आहे. गुगलच्या या कॅमेरा अ‍ॅपचा सर्वाधिक फायदा अँड्राईड गो असणाऱ्या एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये पोट्रेट मोडसारखे फीचर्स मिळतील.

अँड्राईड गो ला गुगलने 2018 मध्ये स्वस्त स्मार्टफोनसाठी लाँच केले होते. गुगल कॅमेरा गो अ‍ॅपला नोकिया 3.1 स्मार्टफोनसोबत लाँच करण्यात आले आहे. दुसरे अँड्राईड गो युजर्स देखील प्ले-स्टोरवरून हा अ‍ॅप डाउनलोड करू शकतात. सध्या अँड्राईड गो एडिशनचे जगभरात 10 कोटी अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.

या अ‍ॅपमध्ये युजर्सला पिक्सल फोनच्या कॅमेरा अ‍ॅपसारखे सर्व फीचर्स मिळतील. गुगल पिक्सल फोनप्रमाणेच यात पोट्रेट मोड देखील मिळेल. सोबतच अ‍ॅपमध्ये फोटो, व्हिडीओ आणि भाषांतरचे फीचर्स देखील मिळेल.

कॅमेरा गो अ‍ॅपमध्ये गुगल लेंस सपोर्ट मिळेल. पोट्रेट मोड फीचर्स सर्वसाधारणपणे प्रीमियम स्मार्टफोन अथवा दोन लेंस असणाऱ्या फोनमध्येच मिळते. मात्र अँड्राईड गो व्हर्जन असणाऱ्या अधिकांश फोनमध्ये सिंगल कॅमेराचा आहे. त्यामुळे स्वस्त स्मार्टफोन असणाऱ्या युजर्सला फोटो काढण्यासाठी हे अ‍ॅप फायदेशीर ठरेल.

Leave a Comment