तळीरामांची गैरसोय होऊ नये यासाठी उच्च न्यायालयात याचिका


केरळ – जगभरातील हजारो नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून याची लाखो लोकांना लागण झाली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 300 च्या जवळ पोहोचला आहे. एकीकडे सरकार लोकांना गर्दी करू नका, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असे आवाहन करत आहे, तर याच गर्दीच्या कारणामुळे केरळमध्ये एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शहरातील अनेक दुकाने कोरोनामुळे बंद करण्यात आली आहेत, पण दारूच्या दुकानात गर्दी कायम आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आणि तळीरामांची गैर सोय होऊ नये यासाठी दारूची होम डिलिव्हरी सुरू करावी अशी याचिका केरळ मधील जी. ज्योतिष नावाच्या एका व्यक्तीने केरळ उच्च न्यायालयात दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली असता याचिका कर्त्याला न्यायालयाने चांगलेच झापले. न्यायालयाने नाराजी दर्शवत याचिकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्यात येईल. न्यायालय फक्त जनहित याचिकेवर सुनावणी करते, वयक्तिक हितसंबंधाच्या याचिकांवर नाही, असे म्हणत न्यायालयाने याचिका कर्त्याला फटकारले.

याचिकाकर्त्यांची आपल्या याचिकेत दारूच्या दुकानांवर कोरोनामुळे गर्दी होत आहे. गर्दीतून वाचण्यासाठी दारूची घरपोच सेवा सुरू करण्यात यावी, यामुळे दारू पिणारे लोक गर्दी टाळतील आणि कोरोनापासून वाचतील, असे म्हटले. अलूवा येथील जी. ज्योतिष नावाचा हा व्यक्ती असून कोरोना पसरण्याचा धोका गर्दीमुळे वाढेल, यामुळे उच्च न्यायालयाने अबकारी विभागाला आदेश देऊन, दारूची ऑनलाईन विक्री सुरू करावी, असे याचिकेत नमूद केले होते. पण उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला दंड ठोठावला आहे.

Leave a Comment