आता पुण्यातील रस्त्यांवर थुंकणे पडणार महागात; महापौरांनी घेतला निर्णय


पुणे – मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास 1000 रूपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर आता पुण्यातील थुकरटांवर कारवाई करत दंड वसूल केला जाणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पुणे महानगरपालिका कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी रस्त्याबरोबरच आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर प्राधान्याने कारवाई करत आहे. त्याचबरोबर पूर्वी आकारला जाणारा 150 रुपये दंड आता वाढवून 500 रु करण्यात आला असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. कोराना हा संसर्गजन्य आजार असल्याने थुंकीमार्फतही पसरू शकतो. त्याची लागण इतर नागरिकांना होऊ शकते यासाठी पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला गेल्याची माहिती समजत आहे.

Leave a Comment