पिंपरी चिंचवडमधील कोरोनाच्या 90 निगेटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज


पुणे – जगभरातील अनेक देशांना आपल्या विळख्यात घेतल्यानंतर कोरोना व्हायरसने भारतातही आपला प्रादुर्भाव सुरु केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज 271 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात तब्बल 63 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील 90 जणांची रुग्णांची तपासणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधित रुग्णांची पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांवर सुरू होते. पण यातील 90 रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अद्याप यातील 3 रुग्णांची तपासणी प्रलंबित आहे. यासंदर्भातील माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

Leave a Comment