नागपुरकरांना तुकाराम मुंढेंचा विनंतीवजा इशारा


नागपूर : नागपुरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपुरकरांना लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती केली आहे. पण जर कोणी घराबाहेर पडले तर त्यांना जबरदस्ती बसवावे लागेल असा विनंती वजा इशारा दिला आहे. रस्त्यावर उतरत जनतेला बाहेर न निघण्याचे आवाहन नागपुर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.

नागपूर शहरात लॉकडाऊन असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. लोकांनी लॉकडाउनमध्ये घरात बसने अपेक्षित आहे, पण अजूनही शहरातील लोक घरात बसत नाहीत हे दुर्देव असल्याचे तुकाराम मुंढे म्हणाले. विषाणू पासून रोखण्यासाठी हा लॉकडाउन आहे. तरीही लोक घरात बाहेर पडत असल्याचे आयुक्त मुंढे म्हणाले.

तुम्हाला मी परत विनंती करतो की घराबाहेर पडू नका. आता नाकाबंदी सुरू केली आहे. तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आम्हाला साथ द्या. तुम्ही घरात रहा. बाहेर पडू नका. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा अशी विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली.

Leave a Comment