बिल गेट्सनी ५ वर्षापूर्वीच दिला होता चीनी विषाणूचा इशारा


फोटो सौजन्य डेली एक्सप्रेस
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पाच वर्षापूर्वीच जीवघेण्या विषाणूचे संक्रमण जगात होईल आणि त्याची सुरवात चीनी बाजारापासून होईल असा इशारा एका कार्यक्रमात बोलताना दिला होता मात्र त्याकडे कुठल्याच देशाच्या सरकारने गंभीरपणे पहिले नाही. त्याचा परिणाम आज करोना विषाणूच्या रुपात जगापुढे गंभीर रूप धारण करून उभा ठाकला आहे.

बिल गेटस यांनी येत्या काही वर्षात चीनी बाजारातून जागतिक महामारी पसरेल आणि लाखो लोक जीवाला मुकतील असा इशारा दिला होता. ते असेही म्हणाले होते की, या महामारीचा गंभीर परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईलच पण अन्य नुकसानही प्रचंड प्रमाणात होईल. जागतिक महायुद्धापेक्षा अधिक संखेने लोक यात मारले जातील. आज कोविद १९ मुळे जगभरात २.३६ लाख लोक संक्रमित आहेत तर ११ हजारावर अधिक लोक प्राणास मुकले आहेत.

गेट्स यांनी या कार्यक्रमात बोलताना श्रीमंत देशांनी अश्या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्वरेने काही पावले उचलली, युद्धस्तरावर तयारी केली तर आपण या धोक्यापासून वाचू शकू असेही म्हटले होते. गेट्स म्हणाले होते पुढच्या दशकात थोडक्या काळात १० लाखाहून अधिक माणसे ठार होतील ती युद्धामुळे नाही तर विषाणूमुळे. मिसाईल्स इतकी माणसे एकावेळी मारू शकणार नाहीत मात्र विषाणू मारू शकतील. इबोला विषाणूने त्याची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी अण्वस्त्रे बनविण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यापेक्षा महामारी प्रतिबंधासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Leave a Comment