या अटीवर कुटुंबियांना सोपवले जाणार आरोपींचे मृतदेह


नवी दिल्ली – निर्भयाच्या गुन्हेगारांना सात वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर फासावर लटकवण्यात आले आहे. चारही दोषींनी आज पहाटे ५.३० वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात आल्यानतर दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

मृतदेह तिहार तुरुंगातून रुग्णालयात आणण्यात आले असून तुरुंग प्रशासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार चौघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहेत. पण मृतदेहांवर अंत्यसस्कार करताना कसलेही प्रदर्शन न करण्याचे कुटुंबियांकडून लेखी लिहून घेण्यात आले आहे. यावेळी रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment