कोरोना : या कंपनीने हॉस्पिटलला दान केले 50 हजार मास्क

स्वीडनच्या गोथेनबर्ग येथील मोठ्या सरकारी हॉस्पिटलला एका फर्नीचर कंपनी आयकियाने 50 हजार फेस मास्क दान केले आहेत. कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना, हे मास्क दान करणे मोठी गोष्ट समजली जात आहे. कंपनीने बर्ड फ्लू पसरला होता, त्या काळात हे मास्क खरेदी केले होते. त्यानंतर हे मास्क तसेच गोदामात पडून होते.

स्वीडनमध्ये आतापर्यंत 1,167 लोकांना या व्हायरसची लागण झाली असून, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. फर्नीचर कंपनी आयकियाचे लॉजिस्टिक मॅनेजर जोहान अँडरसन यांनी सांगितले की, हे मास्क बर्ड फ्लूच्या काळात मोठ्या संख्येने खरेदी करण्यात आले होते. अचानक गोदामामध्ये टीमला हे मास्क सापडले.

त्यांनी सांगितले की, त्यांना बातम्या वाचून माहिती मिळाली होती की हॉस्पिटलला मास्कची कमतरता जाणवत आहे. हॉस्पिटलला विचारल्यावर ते मास्क स्विकारण्यास तयार झाले. हे देशातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे.

Leave a Comment