अवघ्या 38 मिनिटात समाप्त झाले जगातील सर्वात छोटे युद्ध

इतिहासातील अनेक युद्ध वर्षांनुवर्ष चालली. प्रथम विश्वयुद्ध असो की द्वितीय विश्वयुद्ध, ही सर्व युद्ध 4 ते 6 वर्ष चालली. मात्र इतिहासात असेही एक युद्ध झाले आहे, जे केवळ 38 मिनिटेच चालले. हे जगातील सर्वात छोटे युद्ध म्हणून ओळखले जाते.

Image Credited – Amarujala

हे युद्ध इंग्लंड आणि जांजीबार यांच्यामध्ये लढले गेले होते. जांजीबार एक द्वीपसमूह आहे आणि सध्या तंझानियाचा भाग आहे. 1890 मध्ये जांजीबारने ब्रिटन आणि जर्मनीमध्ये झालेल्या एका करारावर स्वाक्षरी केली होती. या करारामुळे जांजीबारवर ब्रिटनचा अधिकार होता. तर तंझानियाच्या अधिकांश भागावर जर्मनीची मक्तेदारी होती. करारानंतर ब्रिटनने जांजीबारची जबाबदारी हमद बिन थुवैनीला सोपवली. यानंतर थुवैनीने स्वतःला तेथील सुल्तान घोषित केले.

Image Credited – Amarujala

थुवैनीचा 25 ऑगस्ट 1896 ला मृत्यू झाला. त्यानंतर थुवैनीचा भाचा खालिद बिन बर्घाशने स्वतःला जांजीबारचा सुल्तान घोषित केले. त्यानेच थुवैनीला विष देऊन मारल्याचे सांगितले जाते.

Image Credited – Amarujala

जांजीबारवर ब्रिटनचा अधिकार असल्याने बर्घाशने अशाप्रकारे सत्ता मिळवणे त्यांना आवडले नाही. ब्रिटनने खालिदला पदावरून हटण्याचा देखील आदेश दिला, मात्र त्याने ऐकले नाही. खालिदने पद सोडण्यास नकार दिल्याने अखेर ब्रिटनने आपले अधिकार परत मिळवण्यासाठी युद्धाचा मार्ग निवडला.

Image Credited – Amarujala

27 ऑगस्ट 1896 ला ब्रिटनच्या नौदलाने जहाजांच्या मदतीने जांजीबारच्या महालावर बॉम्बचा वर्षाव केला. अवघ्या 38 मिनिटात जांजीबारने हार पत्करली व युद्ध समाप्त झाले. हे इतिहासातील सर्वात छोटे युद्ध समजले जाते.

1963 मध्ये जांजीबार ब्रिटनपासून स्वातंत्र्य झाले. सध्या तन्गानिका आणि जांजीबारच्या संयुक्त गणराज्याला यूनायटेड रिपब्लिक ऑफ तंझानिया असे नाव देण्यात आले आहे. तरी आजही जांजीबार अर्ध-स्वायत्त प्रदेश आहे.

Leave a Comment