पुणेकरांना घरपोच मिळणार हॉटेलचे जेवण


पुणे – एकीकडे कोरोनाग्रस्तांची पुण्यातील संख्या वाढत असताना दुसरीकडे पुणेकरांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटवर बंदी असताना पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. हॉटेलमध्ये किचन सुरू ठेवण्याकरिता प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना जेवण बाहेरून मागवता येणार आहे.

त्यातच तळीरामांची घोर निराशा करणार निर्णय देखील घेण्यात आला आहे. आता पुणे जिल्ह्यातील वाईन शॉप आणि बीअरशॉपही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वीच रेस्टॉरंट आणि परमिट रूम बंद झाले आहेत. त्यातत आता जिल्ह्यातील मद्यविक्रीला 31मार्च पर्यंत ब्रेक लागणार आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली असून ही संख्या आता 21 वर पोहोचली आहे. पुण्यातील एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे नसूनदेखील कोरोना संदर्भातील रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे पुण्यात असे कितीजण कोरोना वाहक बनून फिरत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Comment