पोरट्रॉनिक्स कंपनीने भारतीय बाजारात स्मार्ट लॉक लाँच केले आहे. या लॉकला बायोलॉक असे नाव देण्यात आले असून, हे लॉक चक्क फिंगरप्रिंटने उघडते. खास गोष्ट म्हणजे 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये या लॉकची बॅटरी 6 महिने चालते.
बाजारात आले फिंगरप्रिंटने उघडणारे स्मार्ट लॉक
या लॉकद्वारे दरवाजा, सुटकेस, बॅग्स आणि बाईक देखील लॉक करता येते. या लॉकमुळे पासवर्ड अथवा चावी विसरण्याची देखील समस्या राहणार नाही, कारण हे लॉक तुम्ही थेट फिंगरप्रिंटने उघडू शकता.
या लॉकमध्ये 40 फिंगरप्रिंट जोडता येतील. फिंगरप्रिंटने लॉक खोलण्यास केवळ 0.5 सेंकदांचा वेळ लागेल, असा दावा कंपनीने केला आहे. बायोलॉक एका एलईडी इंडिकेटरसोबत येते. हे स्मार्टलॉक स्टेनलेस स्टिलने बनलेले आहे व याला आयपी66 रेटिंग मिळालेली आहे. त्यामुळे याच्यावर पाणी व धुळीचा परिणाम होत नाही.
स्मार्ट लॉकचे वजन 59 ग्रॅम आहे. यात 100mAh ची इन-बिल्ट बॅटरी असून, बॅटरी 30 मिनिटात फूल चार्ज होते व 6 महिने टिकते. या स्मार्ट लॉकची किंमत 2,999 रुपये असून, या सोबत 12 महिन्यांची वॉरंटी देखील मिळते.