आता प्रतिक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची


मुंबई – अखेर 2650 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेल्या निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. आज तिहार जेलमध्ये एकाच वेळी चौघा आरोपींना फाशी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळवा, अशी मागणी केली आहे.

देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी ही घटना आहे. निर्भयाला न्याय मिळाला, आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची. लवकरात लवकर कोपर्डीचे बलात्कारी नराधम सुद्धा फासावर लटकले पाहिजेत. राज्यसरकारने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

संभाजीराजेंनी गुन्हेगारांना आमच्या माता भगिनीवर वाईट नजरेने बघण्याचे धाडस सुध्दा झाले नाही पाहिजे असे म्हणत मा. राष्ट्रपती आणि मा. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व देशवासियांच्या वतीने आभार मानले आहेत. दरम्यान, निर्भयाला न्याय मिळाला याचे मला समाधान आहे. त्याचबरोबर निर्भयाची आई ही मला मिळालेली ओळख अभिमानास्पद असल्याचे निर्भयाच्या आईने म्हटले आहे.

Leave a Comment