या महिला वकिलामुळे मिळाला निर्भयाला न्याय

सात वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली आहे. 2012 पासून आतापर्यंत निर्भयासाठी चाललेल्या या लढाईत सर्वात महत्त्वाची भूमिका वकील सीमा कुशवाहा यांची होती. सीमा कुशवाहा कोण आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या सीमा कुशवाहा यांनी दिल्ली विद्यापीठातून लॉचे शिक्षण घेतले आहे. वर्ष 2012 मध्ये निर्भया घटना घडली त्यावेळी सीमा सर्वोच्च न्यायालयात ट्रेनिंग घेत होत्या. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी निःशुल्क केस लढण्याचा निर्णय घेतला. ही त्यांच्या वकिली कारकिर्दीमधील पहिलीच केस होती व यात त्यांचा विजय झाला.

Image Credited – Amarujala

खालच्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सीमा प्रत्येक वेळी निर्भयासाठी बाजू मांडत राहिल्या. या 7 वर्षात केवळ न्यायालयातच नाही, तर न्यायालयाच्या बाहेर देखील सीमा निर्भयाच्या पालकांसोबत उभ्या राहिल्या.

Image Credited – Amarujala

2014 मध्ये त्या ज्योति लीगल ट्रस्टशी देखील जोडल्या गेल्या. ही ट्रस्ट दुष्कर्म पीडितांचे प्रकरण मोफत लढते व त्यांना कायदेशीर सल्ला देते. सीमा यांना आयएएस अधिकारी बनायचे होते. मात्र नशीबाने त्या वकील झाल्या.

Image Credited – Amarujala

सीमा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. त्या सांगतात की, निर्भयाची केस लढणे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान होते. या काळात निर्भयाचे कुटुंब व खासकरून आईसोबत एक भावनिक नाते तयार झाले.

दोषींना फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या आई आशा देवी सिंह यांनी सर्वात प्रथम सीमा यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, सीमा यांच्याशिवाय हा प्रवास करणे शक्य नव्हते.

Leave a Comment