पवन जल्लादने मोडला आपल्या पुर्वजांचा विक्रम

निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी दिल्यानंतर पवन जल्लादचे स्वप्न पुर्ण झाले आहे. तिहार तुरूंगात पवनला दोन दिवसांपासून प्रशासनाकडून ट्रेनिंग देण्यात येत होती. पवन जल्लादचे म्हणणे आहे की, हे स्वप्न त्याच्या वडिलांचे होते, मात्र त्यांना कधी संधी मिळाली नाही.

त्याने आपले आजोबा कल्लू जल्लाद यांच्याकडून फाशी देण्यास शिकले होते. तिहार जेलमध्ये पवनने निर्भया प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता फाशी दिली.

पवन जल्लादचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहे. पवननुसार, त्याचे आजोबा कल्लू आणि पणजोबा लक्ष्मण राम फाशी द्यायचे. कुख्यात रंगा बिल्ला, माजी पंतप्रधान यांची हत्या करणारा सतवंत सिंह व केहर सिंहला कल्लू जल्लादने फाशी दिली होती. मात्र पवनच्या आजोबा-पणजोबाने एकसोबत चार जणांना कधी फाशी दिली नव्हती.

पवन जल्लादने त्यांचा हा विक्रम मोडला आहे. पवन एकमात्र जल्लाद आहे, ज्याला तिहार तुरुंगात निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी दोन दिवसांचे ट्रेनिंग देण्यात आले होते.

कारागृह प्रशासनाने पवनला फाशी देण्यासाठी पुर्णपणे तयार केले होते. तीन दिवसांपुर्वीच त्याला तिहारमध्ये आणण्यात आले होते. त्याला मेरठच्या कारागृहात देखील फाशी देण्याची पद्धत शिकवण्यात आली होती.

Leave a Comment