कोरोना : म्हणून एचडी व्हिडीओ बंद करणार नेटफ्लिक्स !

कोरोना व्हायरसमुळे अर्ध्यापेक्षा अधिक जग घरात कैद झाले आहे. लाखो लोक घरातून काम करत असून, जे लोक घरीत आहेत ते ऑनलाईन व्हिडीओ पाहून व गेम खेळत वेळ घालवत आहेत. याच पार्श्वभुमीवर यूरोपियन यूनियनने नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ स्ट्रिमिंग सारख्या प्लॅटफॉर्मला हाय डिफिनेशन (एचडी) क्वॉलिटी व्हिडीओ दाखवणे बंद करावे असे सांगितले आहे.

यूरोपिय आयुक्त थेयरी ब्रेटन यांनी ट्विट करत सांगितले की, ब्रिटनच्या सर्व कंपन्यांनी काही दिवसांसाठी स्टँडर्ड डिफिनेशन (एसडी) क्वॉलिटीमध्ये व्हिडीओ स्ट्रिमिंग करायला हवी. थेअरी यांनी हे ट्विटर नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभुमीवर केले. ते म्हणाले की, जेव्हा आवश्यक नसेल त्यावेळी एचडी व्हिडीओ बंद करायला हवे.

या विषयी नेटफ्लिक्सचे प्रवक्ते म्हणाले की, याविषयी हेस्टिंग्स आणि ब्रेटन एकमेंकाशी संवाद साधतील. नेटफ्लिक्सने सांगितले की, कंपनीने याआधीच व्हिडीओ क्वॉलिटीला एडजस्ट केले आहे. जेणेकरून कमी बँडबिड्थवर चांगली व्हिडीओ क्वॉलिटी मिळेल.

Leave a Comment