ब्रम्हांडात होणाऱ्या स्फोटांचा अभ्यास करणार नासा

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने 4 नवीन मिशनसाठी प्रस्तावाची निवड केली आहे. जे ब्रम्हांडात होणारे स्फोट आणि मागे राहणाऱ्या अवशेषांचा अभ्यास करतील. हे मिशन वर्ष 2025 पर्यंत लाँच केले जातील.

सोबतच या स्फोटांमुळे ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या वायूमंडळावर याचा कसा परिणाम होतो, हे पाहिले जाईल. भविष्यातील मिशनचे सविस्तरपणे मुल्यांकन केल्यानंतर नासाने आपल्या तपास कार्यक्रमांतर्गत खगोल भौतिकी मिशन आणि मिशन ऑफ अपॉर्च्युनिटीसाठी 2-2 प्रस्तावांची निवड केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 39 कोटी प्रकाशवर्ष लांब ब्रह्मांडात सर्वात मोठा स्फोट झाल्याचा शोध लावला आहे. हा बिग बँगनंतरचा सर्वात मोठा स्फोट असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment