देशात आतापर्यंत झाली 755 जणांना फाशीची शिक्षा

जगभरात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा असावी की नसावी, या गोष्टींवरून सतत वाद सुरू असतात. काही जणांचे मत आहे की गंभीर गुन्ह्यासाठी मृत्यूदंड गरजेचा आहे. तर मानवाधिकारवाद्यांनुसार, गुन्हेगारांवर या शिक्षेचा मोठा परिणाम होत नाही.

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेवरून देखील हा वाद पुन्हा सुरू झाला होता. काहीजण या प्रकरणातील चारही गुन्हेगारांची शिक्षा माफ करावी असे म्हणत होते, तर काही जण या दोषींना फासावर लटकवण्याची मागणी करत होते.

1955 मध्ये भारतात फाशी संदर्भात महत्त्वपुर्ण बदल करण्यात आले आहेत. संसदेने सीआरपीसी कलम 367 (5) हटवले होते. या कलमानुसार, जर एखादा गुन्हेगार मृत्यूदंडाच्या शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात दोषी आढळला असेल, मात्र न्यायालयाने त्याला फाशी दिली नसेल, तर या संदर्भात न्यायालया स्पष्टीकरण द्यावे लागते. 1973 मध्ये सीआरपीसीमध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले.

कायदा आयोग –

1967 ला कायदा आयोगाने आपल्या 35व्या अहवालात मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवण्याच्या बाजूने भूमिका घेतली होती. त्यावेळी भारतीय समाजाची तत्कालिन परिस्थिती बघून आयोगाने हा निर्णय घेतला होता.

2015 मध्ये मात्र 262 व्या अहवालात कायदा आयोगाने म्हटले की, मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेच्या तुलनेत गुन्हेगारांमध्ये जास्त भिती निर्माण करत नाही. त्यामुळे दहशतवाद आणि राष्ट्राच्या विरोधातील गुन्हेगारांना सोडून अन्य गोष्टींसाठी फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी.

देशात आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 366, हरियाणा 103, मध्य प्रदेश 78, महाराष्ट्र 56, कर्नाटक 39,  प. बंगाल 32, आंध्र प्रदेश 27, दिल्ली 25, पंजाब 10, जम्मू-कश्मिर 05 आणि ओडिसामध्ये 05 जणांना मृत्यूदंड देण्यात आलेला आहे.

विविध देशात वेगवेगळे प्रावधान –

प्रत्येक देशात मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. 73 देशांमध्ये गोळ्या घालून मृत्यूदंड दिला जातो. 45 देशांमध्ये फायरिंग स्क्वॉड मृत्यूदंडाची शिक्षा लागू करतो. भारतासह 33 देशांमध्ये मृत्यूदंडासाठी फाशीची तरतूद आहे. 6 देशांमध्ये दगड मारून मृत्यूदंड देतात. 5 देशात विषारी इंजेक्शन आणि 3 देशांमध्ये शिरच्छेद करून मृत्यूदंड दिला जातो.

अफगाणिस्तान, सुदानमध्ये फायरिंग, फाशी, दगड मारून मृत्यूदंड दिला जातो. बांगलादेश, कॅमेरून, सीरिया, युगांडा, कुवैत, इराण, इजिप्तमध्ये फायरिंग आणि फाशीद्वारे शिक्षा दिली जाते. भारत, मलेशिया, बारबाडोस, बोत्सवाना, तंजानिया, झाम्बिया, झिम्बाब्वे, दक्षिण कोरियामध्ये फाशी देण्यात येते. यमन, टोगो, तुर्कमेनिस्तान, थायलँड, बहरीन, चिली, इंडोनेशिया, घाना, अर्मीनियामध्ये फायरिंग  , फिलिपाईन्समध्ये इंजेक्शन, चीनमध्ये इंजेक्शन, फायरिंग आणि अमेरिकेत इलेक्ट्रोक्यूशन, फाशी आणि फायरिंगद्वारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.

इतर देशांमध्ये मागील 10 वर्षात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली नाही. तेथे केवळ युद्धाच्या काळात या शिक्षेचा वापर केला जातो.

Leave a Comment