नोकियाने लाँच केले सिम कार्ड

नोकिया स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने आपले दोन नवीन स्मार्टफोन नोकिया 1.3 आणि नोकिया 5.3 ला यूरोपमध्ये लाँच केले आहे. या फोनसोबतच एचएमडी ग्लोबलने सिम कार्ड देखील लाँच केले आहे. एचएमडी ग्लोबलच्या या सिम कार्डसोबत युजर्सला डाटा मिळेल.

या सिम कार्डला एचएमडी कनेक्ट ग्लोबल डाटा सिम कार्ड (HMD Connect global data SIM card) नाव दिले आहे. या सिमसोबत ग्राहकांना कॉलिंगची सुविधा मिळणार नाही, तर केवळ डाटाची सुविधा मिळेल.

या सिममध्ये 14 दिवसांच्या कालावधीसाठी 1 जीबी डाटा मिळेल. ग्राहक आपल्या सुविधेनुसार हा डाटा वाढवू शकतात. हे सिम जगभरातील 120 देशांमध्ये सपोर्ट करेल.

सिम कार्डच्या स्टार्टर किटची किंमत 19.95 यूरो (1,600 रुपये) आहे. सेकेंड स्टार्टर किटची किंमत 800 रुपये आहे. एचएमडी ग्लोबलच्या वेबसाईटवरून हे सिमकार्ड ऑर्डर करता येईल. सध्या भारतात सिम कार्डची डिलिव्हरी सुरू झालेली नाही.

डाटा सुरू करण्यासाठी यात एचएमडी कनेक्ट अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. हे सिम कार्ड खास देशविदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी बाजारात आणण्यात आले आहे. जेणेकरून एखाद्या ठिकाणी गेल्यावर लोकल सिम खरेदी करावे लागू नये.

Leave a Comment