कोरोना : पायलटने आकाशात ‘स्टे होम’ लिहित दिला सुरक्षित राहण्याचा संदेश

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोक विविध मार्ग वापरत आहेत. तसेच एकमेंकाना काळजी घेण्यास व जागृक करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे. असाच प्रयत्न ऑस्ट्रियातील एका अज्ञात पायलटने केला आहे.

या अज्ञात पायलटने कोरोना व्हायरस महामारी दरम्यान घरात सुरक्षित राहण्याचा लोकांना संदेश दिला आहे. यासाठी त्याने आकाशात डिजिटल स्काय रायडिंग करत ‘स्टे होम’ असा संदेश लिहिला.

वेबसाइट फ्लाइटर 24 नुसार, स्टे होम हा संदेश लिहिण्यासाठी पायलटने प्लाइट रायडरचा वापर केला. पायलटने व्हियनावरून 80 किमी लांब व्हिनर नेस्टाडट विमानतळावरून उड्डाण घेतले. स्टे होम हा संदेश लिहिण्यासाठी त्याला 24 मिनिटे लागली.

दरम्यान, ऑस्ट्रियामध्ये आतापर्यंत 1843 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे.

Leave a Comment