भारतीय आंब्याची रशिया, चीनला लागली चटक


फोटो सौजन्य अमेरिकन बझार
भारतीय आंब्याची गुणवत्ता, स्वाद, त्यातील पौष्टिक तत्वे आणि आकर्षक रंग याची भुरळ आता जगातील अन्य देशांप्रमाणे चीन, रशिया आणि ऑस्ट्रेलियाला पडली असून भारतीय आंब्याची चटक या देशांना लागली आहे. भारतीय आंब्याच्या लोकप्रियतेत हे तीन देश टॉपवर असल्याचे दिसून आले आहे.

भारतीय आंबा, त्याच्या विविध जाती, गुणधर्म जगाला परिचित व्हावेत म्हणून आणि आपले राष्ट्रीय फळ आंबा जगात लोकप्रिय व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय आंबा डेटाबेस वेबसाईट बनविली गेली आहे. त्याला १ वर्षात ३४ लाख लाईक मिळाले आहेत. त्यात ७ लाख लाईक्स भारतीयांकडून तर २७ लाख परदेशातून मिळाले आहेत. अमेरिकेतून ६ लाख लाईक्स आले आहेत.

या संदर्भात लखनौच्या सीआयएसएच संस्थेचे प्रमुख शैलेन्द्र राजन म्हणाले, रशिया, चीन आणि ऑस्ट्रेलिया मधून सर्वाधिक लाईक्स या वेबसाईटवर आले आहेत. या देशातून आंब्याबरोबर आंब्याच्या अन्य उत्पादनांनाही मागणी आली आहे. या साईटवर आंब्याच्या ५०० विविध जातींची माहिती दिली गेली असून देशातील ४५० पेक्षा अधिक आंबा उत्पादक शेतकरी यांचीही माहिती दिली गेली आहे.

Leave a Comment