जेव्हा फाशी दिल्यावर जल्लादच बेशुध्द होतो…


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
निर्भया केस मधील चार आरोपींना आज तिहार जेल मध्ये फाशी दिली गेली. त्यामुळे फाशीची शिक्षा आणि फाशी देणारे जल्लाद यांची चर्चा सुरु झाली आहे. फारच थोड्या लोकांना माहिती असेल की २००४ मध्ये एका बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपीला फाशी दिल्यावर जल्लाद बेशुद्ध पडला होता आणि त्याला स्ट्रेचरवरून बाहेर आणावे लागले होते. फाशी देणाऱ्या जल्लादाला सुद्धा कुणाला फासावर चढविताना हिम्मत दाखवावी लागते आणि धीर गोळा करावा लागतो याची ही घटना साक्ष म्हणावी लागेल.

२००४ मध्ये कोलकाताच्या अलीपूर मध्यवर्ती कारागृहात धनंजय चटर्जी याला फाशी दिली गेली होती. त्याच्यावर १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप होता. ही मुलगी जेथे राहत असे त्याच सोसायटी मध्ये धनंजय गार्ड म्हणून नोकरी करत होता. ही मुलगी तिच्या घरात मृतावस्थेत सापडली होती. तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला गेला होता. यात धनंजयवर आरोप होता आणि १४ वर्षे केस चालल्यावर त्याला फाशीची शिक्षा दिली गेली होती. रेप प्रकरणात फाशीची शिक्षा दिली जाण्याची ही देशातील पहिली घटना.

धनंजयला १४ ऑगस्ट २००४ ला फाशी दिले गेले आणि याच दिवशी त्याचा वाढदिवस होता. त्यावेळी जल्लाद नाटा मलिक याला फासावर चढविण्याच्या कल्पनेने धकका बसला होता त्यामुळे त्याने मुलाच्या मदतीने फासाचा दोर धनंजय याच्या गळ्यात अडकविला आणि खटका ओढला. त्याचवेळी नाटा बेशुद्ध पडला आणि त्याला स्ट्रेचर वरून बाहेर आणावे लागले होते. विशेष म्हणजे हाच नाटा फाशी दिलेल्या दोराची लॉकेट करून मोठ्या किमतींना विकण्याबद्दल प्रसिद्ध होता. त्याचे २००९ साली वयाच्या ८९ वर्षी निधन झाले.

Leave a Comment