विराट, धोनी, गांगुली आणि १८३ चे असे आहे कनेक्शन


फोटो सौजन्य एंटरटेनमेंट
टीम इंडियाच्या यशस्वी कप्तानांच्या यादीत विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली यांचे स्थान बरेच वरचे आहे कारण या तिघांनीही भारतीय क्रिकेटला आजची उंची मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. या तिघांच्या मध्ये अनेक गोष्टी समान आहेत. पण एक जरा वेगळे कनेक्शन या तिघात आहे ते त्यांनी काढलेल्या धावांचे. १८३ हा आकडा त्यासंदर्भात या तिघांना जोडणारा ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मध्ये या तिघांचा सर्वाधिक स्कोर आहे १८३ रन्स. या तिघानांही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट मध्ये डबल सेन्चुरी करता आलेली नाही मात्र आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात तिघांनीही डबल सेन्चुरी केली आहे. गांगुलीने १९९९ मध्ये वर्ल्ड कप खेळताना श्रीलंकेविरुध्द १८३ रन्स काढल्या होत्या. त्याचा टेस्ट मधील सर्वाधिक स्कोर आहे २३९ रन्स.

महेंद्रसिंग धोनीने ३१ ऑक्टोबर २००५ मध्ये जयपूर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळताना चौकार, षटकारांची आतषबाजी करत १८३ रन्स काढल्या होत्या. त्याने १४५ चेंडूत १५ चौके आणि १० छक्के मारून १८३ रन्स काढल्या असून विकेटकिपरने वनडे मध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला होता. धोनीचा बेस्ट टेस्ट स्कोर आहे २२४ रन्स.

विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्ध खेळताना १८ मार्च २०१२ मध्ये ढाका येथे १८३ रन्स काढल्या त्यात २२ चौकार आणि एक षटकार होता. विराटचा बेस्ट टेस्ट स्कोर आहे २५४ रन्स.

Leave a Comment