चुकीची माहिती देणाऱ्या पोस्टवर ट्विटरने घातली बंदी

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने कोरोना व्हायरसची चुकीची माहिती देणाऱ्या पोस्टवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्सला चुकीची माहिती देऊन भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात होता. याआधी फेसबुकने देखील कोरोना व्हायरसची चुकीची माहिती देणाऱ्या जाहिरातींना हटवले होते.

या कंपन्यांचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या पोस्ट लोकांना चुकीची माहिती देत आहेत व हे आमच्या नियमांचे उल्लंघन आहे.

ट्विटरने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, आम्ही आमच्या युजर्ससाठी नवीन गाईड लाईन तयार केली आहे. या गाइड लाईन अंतर्गत युजर्स लोकांपर्यंत आरोग्यासंबंधी चुकीची माहिती पोहचवू शकणार नाहीत.

फेसबुकने काही दिवसांपुर्वीच कोरोना व्हायरस संदर्भातील भ्रामक जाहिराती हटवल्या आहेत.

Leave a Comment