मुंबई महापालिकेने एका दिवसात थुकरटांकडून वसूल केला एवढा दंड


मुंबई – मुंबई महानगरपालिकेने कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास 1000 रूपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पालिकेने केलेल्या सूचनेनंतरही मुंबईतील थुकरटांची सवय काही केल्या जात नाही. मुंबई महापालिकेने काल केलेल्या कारवाईत थुकरट मुंबईकरांना आपला खिसा खाली करावा लागला.

मुंबई महापालिकेने काल दंड वाढवल्यानंतर एका दिवसात 111 जणांवर कारवाई करत 46 जणांना सावधान केले, तर 111 जणांकडून तब्बल 1 लाख 11 हजार रूपये इतका दंड वसुल करण्यात आला. त्यातच आता प्रत्येक तासाला थुंकरटांची संख्या मोजण्यात येणार असून त्या आकड्याचे प्रमाण कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment