चक्क बोटांवर मोजता येते या देशाची लोकसंख्या

एखाद्या मोठ्या कुटुंबात 30 ते 35 लोक अथवा त्यापेक्षाही अधिक लोक असू शकतात. मात्र एक देश असाही जेथे प्राणी आणि मनुष्याची संख्याच केवळ 33 आहे. या देशाची नाव तुम्ही कदाचित याआधी ऐकले नसेल. या देशाचे नाव मोलोसिया असून, हा देश अमेरिकेतील नेवाडाजवळ आहे.

केव्हिन बग येथील राष्ट्रपती आणि हुकुमशहा आहेत. केव्हिन बग हायस्कूलचे विद्यार्थी असताना 1977 मध्ये आपला मित्र जेम्स स्पाइलमॅनसोबत येथे आले होते. दोघांनी मिळून हे क्षेत्र तयार केले व येथे राजेशाही लागू केली.

Image Credited – Amarujala

स्पाइलमॅन राजा झाले तर केव्हिन देशाचे पंतप्रधान झाले. काही दिवसांनी स्पाइलमॅन आणि त्यांच्या पत्नीने हा भाग सोडला. मात्र केव्हिन येथे कायम राहिले व त्यांनी स्वतःला रिपब्लिक ऑफ मोलोसियाचे राष्ट्रपती घोषित केले.

नेवाडा डेटन काउंटी येथील हा भाग आज लहानसा देश झाला आहे. 5 एकरमध्ये पसरलेल्या मोलोसियाच्या 1.3 एकर भागात केव्हिन यांचे कुटुंब राहते. यात त्यांची पत्नी व 7 मुलांचा समावेश आहे. याशिवाय नातेवाईक, नातवंड व पाळीव प्राण्यांना नागरिकता मिळाली आहे.

Image Credited – Amarujala

मागील वर्षी 101 पर्यटकांनी मोलोसियाला भेट दिली. येथे डॉलर चालत नाही. पर्यटकांना येथे मोलोसिया बँकेत चलन बदलावे लागते. त्यांना डॉलरच्या जागी वालोरा देण्यात येते. येथे पोस्ट ऑफिस देखील आहे. येथे स्टँप देखील विकले जातात.

मोलोसियाला एक स्वातंत्र्य देश म्हणून यूनायटेज नेशन्सकडून मान्यता मिळालेली नाही. अमेरिका देखील याला स्वातंत्र्य देश मानत नाही. मात्र केव्हिन यांना असे वाटत नाही. त्यांच्यानुसार, ते अमेरिकन सरकारला जो टॅक्स देतात, त्याला विदेशी मदत म्हणतात. मात्र त्यांचे कुटंब अमेरिकेच्या निवडणुकीत भाग घेते.

या देशाच्या स्थापनेला 40 पेक्षा अधिक वर्ष होऊन गेली आहेत, तरीही येथे पर्यटक येत असतात. हा देश फिरण्यासाठी नागरिकांना 2 तासांचा वेळ काढावा लागतो. केव्हिन स्वतः पर्यटकांना येथील बिल्डिंग्स आणि रस्ते दाखवतात.

Leave a Comment