विना रजिस्टर्ड मोबाईल नंबर असे करा आधार कार्ड प्रिंट

आधार कार्डशी लिंक केलेला रजिस्टर्ड मोबाईल नंबर अनेक कामासाठी महत्त्वाचा असतो. पुन्हा आधार प्रिंट करण्यासाठी हा मोबाईल नंबर आवश्यक असतो. मात्र आता विना रजिस्टर्ड मोबाईल नंबर पुन्हा प्रिंट करू शकता.

यूआयडीएआयने मागील वर्षी आधार संबंधी नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे तुम्ही विना रजिस्टर्ड मोबाईल नंबरद्वारे देखील पुन्हा आधार प्रिंट काढू शकता. ही प्रक्रिया जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

विना रजिस्टर्ड मोबाईल नंबरद्वारे आधार प्रिंट करण्यासाठी सर्वात प्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाईट www.uidai.gov.in ला भेट द्या.

Image Credited – Amarujala

तुमच्या स्क्रीनवर माय आधार टॅब उघडेल. तेथे आधार रि प्रिंट पर्याय निवडा.

Image Credited – Amarujala

येथे तुम्हाला 12 अंकांचा आधार नंबर अथवा 16 अंकांचा व्हर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर टाकावा लागेल.

Image Credited – Amarujala

तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवर टॅप करा. येथे मोबाईल नंबर रजिस्टर्ड नाही, असे लिहिलेले असेल. येथे तुम्हाला तुमचा दुसरा मोबाईल नंबर टाकावा लागेल.

Image Credited – Amarujala

तुम्ही टाकलेल्या क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यावर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुर्ण होईल. प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर आधार रिप्रिंटचे शुल्क भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर एक पावती जनरेट होईल. यानंतर तुमचे आधार कार्ड पीडीएफ फॉर्मेंटमध्ये डाउनलोड करून प्रिंट काढू शकता.

Leave a Comment