राज्यसभा सदस्यत्वाची माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी घेतली शपथ


नवी दिल्ली : गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन दिवसांपूर्वीच रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. काँग्रेसने रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी गुरुवारी याच विरोधाचा भाग म्हणून शपथविधीवेळी सभात्याग केला. या नियुक्तीला कम्युनिस्ट पक्ष, डीएमके आणि एमडीएमकेनेही विरोध केला आहे.

रंजन गोगोई नोव्हेंबर 2019 मध्ये देशाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची 16 मार्चला राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना राज्यसभेमध्ये 131 क्रमांकाचा आसन क्रमांक देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांनी रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवर टीका केली होती. या नियुक्तीबद्दल माजी न्यायाधीश मदन लोकूर, ए के पटनाईक, कुरिअन जोसेफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी स्वतः रंजन गोगोई यांनी आपल्या नियुक्तीचे समर्थन केले आहे. कायदे मंडळ आणि न्याय मंडळाने यांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे, यासाठीच मी ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे रंजन गोगोई यांनी सांगितले.

Leave a Comment