कोरोनामुळे संपुष्टात येणार 2.5 कोटी नोकऱ्या – संयुक्त राष्ट्र

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आयएलओ) ‘कोव्हिड 19 आणि काम करणारे जग : प्रभाव आणि प्रतिसाद’ असा मथळा असणारा पहिला मुल्यांकन अहवाल समोर आला आहे. यात कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा, अर्थव्यवस्थेला मदत आणि रोजगार टिकून ठेवण्यासाठी त्वरित, मोठ्या स्तरावर आणि समन्वित उपाय उचलण्याचे आवाहन केले आहे.

आयएलओने म्हटले आहे की, या उपायांमध्ये सामाजिक सुरक्षा प्रदान करणे, रोजगार टिकवून ठेवण्यास मदत  (म्हणजे कमी कालावधीची कामे, पगारी रजा, इतर अनुदान) आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी आर्थिक आणि करात सवलत या गोष्टींचा समावेश आहे.

आयएलओने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आणि श्रम संकटामुळे जगभरातील जवळपास 2.5 कोटी लोक बेरोजगार होऊ शकतात. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, असे संकट 2008 साली पाहण्यास मिळाले होते. जर आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वित धोरणात्मक कृती गांभीर्याने अंमलात आणल्यास जागतिक बेरोजगारीवरील परिणाम लक्षणीय प्रमाणात कमी करता येईल.

दरम्यान, जगभरात आतापर्यंत 8 हजार जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला असून, 2 लाख लोकांना याची लागण झाली आहे. या व्हायरसचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील पाहण्यास मिळत आहे.

Leave a Comment