कोरोना : ऑनलाईन जेवण मागवणे धोकादायक?

अमेरिका आणि इराण सारख्या देशांमध्ये अनेक शहर लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना घरातच राहावे लागत आहे व काम करावे लागत आहे. लोकांचे घराबाहेर निघणे अवघड असल्याने सामान मागवणे आणि जेवण मागविण्यासाठी ऑनलाईन डिलिव्हरीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र ऑनलाईन जेवण मागवणे सुरक्षित आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

खोकताना तोंडातून येणाऱ्या कफ आणि नाकातून येणाऱ्या श्लेषामुळे संसर्ग पसरतो. ऑनलाईन जेवण मागवताना अशीच परिस्थिती आहे. जेवण घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉय अनेक भागातून येत असतो. ज्या लोकांना संसर्ग झाला आहे, तेथे आधी डिलिव्हरी बॉय गेला असेल तर ऑनलाईन जेवणे मागवणे धोकादायक आहे. त्यामुळे ऑनलाईन जेवण मागवणे टाळावे, हेच उत्तम आहे.

अमेरिकेत मॅकडॉनल्ड आणि स्टारबक्स सारख्या कंपन्यांनी नो-कॉन्टॅक्ट अथवा कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीची सुविधा देखील दिली आहे.

भारतात फुड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांना या व्हायरसबाबत जागृक करत आहेत.  फुड डिलिव्हरी कंपन्या आपल्या पार्टनर रेस्टोरेंटच्या किचन स्वच्छतेवर देखील बारीक लक्ष देऊन आहेत. हायजिन रेटिंगनुसारच रेस्टोरेंट लिस्ट करण्यात येत आहेत.

Leave a Comment