कोरोना : किराणा सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या अ‍ॅप्सच्या डाउनलोडिंगमध्ये मोठी वाढ

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जगभरातील अनेक शहरांना लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. लोक स्वतःच्याच घरात कैद झाले असल्याने किराणा सामान आणि खाण्या-पिण्याच्या गोष्टी ऑनलाईन मागवाव्या लागत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसात किराणा सामान डिलिव्हरी करणाऱ्या अ‍ॅप्सच्या डाउनलोडिंगमध्ये वाढ झाली आहे.

अ‍ॅपटोपियाच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत इंस्टाकार्ट, वॉलमार्ट सारखे अ‍ॅप्सच्या दररोजच्या डाउनलोडिंगमध्ये क्रमशः 218 टक्के आणि 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रतिदिन 50 हजारांपेक्षा अधिक वेळा या अ‍ॅप्सला डाउनलोड केले जात आहे.

अ‍ॅपटोपियाने भारतासंबंधी आकडे जारी केले नसले तरी भारतात अनेक जणांच्या डिलिव्हरी रद्द होत आहेत, अथवा उशीरा पोहचत आहेत. फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या डाउनलोडिंगमध्ये देखील 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉनने देखील गरजेच्या नसलेल्या वस्तूंची डिलिव्हरी बंद केली असून, कंपनी मेडिकल आणि जेवणाच्या वस्तू डिलिव्हरी करण्याकडे विशेष लक्ष देत आहे.

Leave a Comment