कोरोना : या देशाने 54 हजार कैद्यांची केली सुटका

चीनच्या वुहान शहरानंतर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इराण आणि इटली या दोन्ही देशांना बसला आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशातील सरकार आपआपल्या स्तरावर पावले उचलत आहेत.

इराणध्ये आतापर्यंत 15 हजारांपेक्षा अधिक जणांना याचा संसर्ग झाला असून, 800 पेक्षा अधिक जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इराणच्या कारागृहात कैद्यांची संख्या देखील मोठी आहे.

या कैद्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून इराणच्या सरकारने 54 हजार कैद्यांची सुटका केली आहे. सरकारने या कैद्यांना कायम स्वरूपी सोडले नसून, अस्थायी स्वरूपात सोडले आहे.

न्यायपालिका प्रवक्ते घोलमहुसैन इस्माइली म्हणाले की, या कैद्यांना सोडताना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी विशेष तयारी करण्यात आली. या कैद्यांमध्ये राजकीय कैद्यांचे मोठे प्रमाण होते. ज्या कैद्यांची शिक्षा 5 वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांची सुटका करण्यात आलेली नाही.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांमध्ये इराण तिसऱ्या स्थानी असून, येथे मृत्यू झालेल्या लोकांचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे.

Leave a Comment