भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 150 पेक्षा अधिक झाली आहे. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत असून, व्हायरसचा प्रसार वाढत चालला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थितीमध्ये नियंत्रण आहे. सध्या भारत या व्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. काळजी घेतल्यास आपण या व्हायरसवर नियंत्रण मिळवू शकतो, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल.
असे आहेत कोरोना व्हायरसचे टप्पे; यात भारत कोणत्या स्थानी
कोरोना व्हायरसच्या प्रसाराचे टप्पे –
पहिला टप्पा –
या टप्प्यात परदेशातून आलेले संक्रमित लोक येतात. या टप्प्यात कोरोना प्रभावित भागातून आलेल्या लोकांना ठेवण्यात आलेले आहे.
दुसरा टप्पा –
दुसऱ्या टप्प्यात ते प्रभावित लोक आहेत, ज्यांना पहिल्या टप्प्यातील लोकांपासून संसर्ग झाला आहे. हे लोक कुटुंब, मित्र आणि संपर्कात आलेले लोक आहेत. भारत सध्या या टप्प्यात आहे.
तिसरा टप्पा –
या टप्प्यात लोकांमध्ये नकळतपणे संक्रमण पसरण्यास सुरूवात होते. म्हणजेच परदेशातून आलेल्या व्यक्तीपासून संसर्ग झालेल्या नातेवाईकांद्वारे इतरांना संसर्ग होणे. संसर्ग कसा व कोठून झाला हे या टप्प्यात सांग अवघड असते. समजा, एखाद्या भाजी विक्रेत्याकडून संसर्ग झाला तर याची माहिती मिळणे अशक्य आहे.
चौथा टप्पा –
या टप्प्यात व्हायरस महामारीचे रुप धारण करते. तर पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात परिस्थिती यापेक्षा भयंकर होते. चीन, इटली आणि यूरोप याच टप्प्यात आहे.
