कोरोना ; आज देशाला संबोधित करणार नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – देशभरातील 166 जणांना आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातील ३ जण दगावले आहेत. तर ५ हजारापेक्षा जास्त जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. देशातील सर्व राज्य सरकारे कोरोनाचा बिमोड करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्येही भीती पसरत आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत.

सातत्याने परिस्थितीची आढावा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन घेत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मंत्रीगटाची स्थापना केली आहे. विविध संबधीत विभागांची रोज बैठक घेण्यात येत आहे. सर्व राज्य सरकारांनाही केंद्र सरकारने निर्देश दिले आहे. नियोजन, बैठका, निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे.

कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमध्ये आढळून आले आहेत. भारताने परदेशातून येणाऱ्या विमानांची उड्डाणे तात्पुरत्या स्वरूपात थांबवली आहेत. नागरिकांना घाबरून जाण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. आज मोदी देशात निर्माण झालेल्या आरोग्य आणिबाणीवर बोलणार आहेत.

Leave a Comment