मच्छर चावल्याने होऊ शकतो का कोरोनाचा संसर्ग ?

कोरोना व्हायरसचा भारतातील प्रसार वेगाने वाढत आहे. यासोबतच उन्हाळा सुरू होणार असल्याने वाढत्या तापमानामुळे मच्छरांचा प्रकोप वाढेल. त्यामुळे कोरोनाग्रस्ताला मच्छर चावल्यानंतर तोच मच्छर दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीला देखील कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

या संदर्भात अनेक युजर्सनी सोशल मीडियावर प्रश्न देखील विचारले आहेत. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे.

Image Credited – Webdunia

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मच्छरांपासून कोरोना व्हायरस पसरतो, या संदर्भात कोणताही पुरावा अथवा माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा व्हायरस शरीरातील श्वसन प्रणालीवर हल्ला करतो. याचा संसर्ग झालेला व्यक्ती जेव्हा खोकतो अथवा शिंकतो, तेव्हा त्यातून बनणारे अति सुक्ष्म कणांद्वारे व्हायरस आजुबाजूच्या लोकांच्या शरीरात पोहचतो. याशिवाय लाळेमधून देखील व्हायरस पसरतो. त्यामुळे खोकला, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून लांब रहा.

Leave a Comment