‘अँटी कोरोना व्हायरस ज्यूस’ विकणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. अनेक गोष्टींचे उत्पादन घटले आहे. तर सॅनिटाइजर, मास्कची मागणी वाढली आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी लोक अफवांवर देखील विश्वास ठेवत आहेत.

काही दिवसांपुर्वीच भारतात ‘कोरोनावाल्या बाबा’ला पकडण्यात आले आहे. जो 11 रुपयांमध्ये कोरोनामधून बरे करणारी तावीज विकत होता. आता केरळमध्ये एका परदेशी व्यक्तीला अँटी कोरोना व्हायरस ज्यूस विकताना अटक करण्यात आले आहे. ही व्यक्ती 150 रुपयांना हा ज्यूस विकत होती.

ही परदेशी व्यक्ती तिरुवनंतपुरम येथून 45 किमी लांब लोकप्रिय पर्यटन ठिकाण प्लेस वर्कला येथे ज्यूस विकत होती. हा व्यक्ती कॅफे टेंपल नावाने कॅफे चालवत होता. त्याने बाहेर अँटी कोरोना व्हायरस ज्यूस नावाचा बोर्ड देखील लावला होता.

स्थानिक लोकांनी बोर्ड बघितल्यावर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या व्यक्तीला पकडले व त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने सांगितले की, हा केवळ आले, लिंबू आणि गुसबेरीने बनलेला एक साधा ज्यूस असून, त्यालाच ‘अँटी कोरोना व्हायरस ज्यूस’ असे नाव देण्यात आलेले आहे.

वर्कला क्षेत्रातील पोलिसांनी सांगितले की, त्या 60 वर्षीच व्यक्तीचा उद्देश चुकीचा नव्हता. तसेच त्याने हा ज्यूस कोणालाही विकला नाही. त्यामुळे त्याला चेतावणी देत सोडून देण्यात आले.

Leave a Comment