अमेरिकेचा अंगाशी आलेला प्रयोग- जहाज कायमचे झाले गायब


फोटो सौजन्य कॅच न्यूज
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात २८ ऑक्टोबर १९४३ या दिवशी अमेरिकेने केलेला एक प्रयोग त्यांच्या चांगलाच अंगाशी आला होता. आजही या प्रयोगाची चर्चा अधून मधून होते कारण त्यामागचे रहस्य शेवटपर्यंत उलगडलेच नव्हते.

युएस नेव्ही मधील डॉ. फ्रँकलीन रेन्रे यांनी नेव्हल डीस्ट्रॉयर युएसएस एल्द्रीजवर फिलाडेल्फिया मध्ये हा प्रयोग केला होता. त्यात अल्बर्ट आईनस्टाइनच्या सापेक्षतावाद सिद्धांतानुसार जहाज शत्रूच्या नजरेतून तसेच रडारवर गायब करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. त्यासाठी दोन मोठे जनरेटर, चुंबकीय वायर, अँप्लीफायर जहाजावर लावले गेले. त्यातून जहाजावर चुंबकीय क्षेत्रात गुढ बदल होणे अपेक्षित होते. जहाज गायब झाले तर युद्धात एक हुकुमाचा एक्का अमेरिकेच्या हाती येणार होता.

प्रयोग सुरु झाला तेव्हा जेव्हा जनरेटर सुरु केला गेला तसे पाण्यातून बुडबुडे वर येऊ लागले, धूर पसरला आणि जहाज खरोखर रडारवर दिसेनासे झाले. काही वेळात लोकांनाही जहाज दिसेनासे झाले. प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला गेला. पण जहाज जेव्हा पुन्हा दिसू लागण्याची प्रक्रिया सुरु केली गेली तेव्हा जहाज दिसलेच नाही. जहाज खरोखरच गायब झाले होते. जहाजावर त्यावेळी काही सैनिक होते. लष्कराने त्वरित जहाजाचा शोध सुरु केला तेव्हा काही काळानंतर ३०० किमी दुरवर या जहाजाचा शोध लागला. पण त्यावेळी जहाजावरील अनेक सैनिक मरण पावले होते तर जे थोडे जिवंत होते त्यांना वेड लागले होते. काही जहाजाच्या मलब्यात दाबले गेले होते असे आढळून आले.

Leave a Comment