शाहरुख बनला नव्या ह्युंदाई क्रेटा एसयुव्हीचा पहिला ग्राहक


फोटो सौजन्य एनडीटीव्ही
बॉलीवूड हिरो शाहरुख खान भारतातील पहिल्या नव्या ह्युंदाई क्रेटा एसयुव्हीचा पाहिला ग्राहक बनला आहे. २०२० सालच्या या एसयूव्हीची डिलीव्हरी कंपनीने सुरु केली आहे. या आठवड्यातच ही एसयुव्ही लाँच झाली असून आत्तापर्यंत १४ हजार युनिक बुक झाली आहेत. शाहरुख या नव्या क्रेटाचा ब्रांड अँबेसीडर असून ही एसयुव्ही म्हणजे पैसा वसूल कार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. शाहरुखला त्याच्या ब्लॅक कलरच्या क्रेटा गाडीच्या किल्ल्या भारतातील कंपनीचे व्यवस्थापक तरुण गर्ग यांनी दिल्या. या निमित झालेल्या कार्यक्रमाला शाहरुख उपस्थित होता.

या एसयुव्हीच्या किमती ९.९० लाखापासून सुरु आहेत आणि टॉप मॉडेलची एक्स शो रूम किंमत १७.२० लाख रुपये आहे. या एसयूव्हीची १.५ लिटर पेट्रोल, १.५ लिटर व्हीजीएफ डिझेल आणि १.४ लिटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन अशी मॉडेल असून जीडीआय पेट्रोल मॉडेल सात स्पीड गिअर बॉक्स सह आहे तर बाकी ६ स्पीड मॅन्युअल सह आहेत. सर्व इंजिन बीएस ६ मानांकनासह आहेत. कारमध्ये ड्यूअल एअरबॅग्ज, एबीएस सह ईबीडी, रिअर पार्किंग कॅमेरा, सेन्सर्स दिले गेले आहेत. १० रंगांमध्ये ही एसयूवी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment