बरे झाल्यावर परत होतो कोरोनाचा संसर्ग ? डॉक्टरांना देखील नाही माहिती

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले दररोज नवीन प्रकरण समोर येत आहेत. मात्र एकीकडे 14 लोक या आजारातून बरे देखील झाले आहेत. या व्हायरसवर अद्याप कोणतीही लस सापडलेली नाही. रुग्ण कोरोना व्हायरसपासून बरा झाल्यावर त्याला घरी पाठवल्यानंतर व्हायरसपासून त्याची पुर्णपणे सुटका होते की नाही ? हे डॉक्टरांना देखील माहित नाही.

सध्या 24 तासात दोनदा तपासणी केल्यानंतर रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यास रुग्णाला घरी पाठवले जात आहे. देशातील आतापर्यंत 139 संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी 14 जणांना घरी पाठवण्यात आलेले आहे. रुग्णांमध्ये परत हा आजार उद्भवेल की नाही माहिती नसल्याने, घरी पाठवल्यानंतर देखील त्यांना आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

जयपूरच्या एसएमएसमध्ये भरती असलेल्या इटलीच्या नागरिकांना ओओस्लेटामिविर, क्लोरीकीन, लोपिनाविर 200एमजी/रिटोनाविर 50 एमजीचे डोस दिवसातून दोनदा देऊन ठीक केले आहे. एचआयव्ही, स्वाइन फ्लू आणि मलेरियाच्या आजारात वापरल्या जाणाऱ्या या तीन औषधांच्या मिश्रणाला आयसीएमआरने मंजूरी दिली आहे. मात्र या औषधांचा वापर सफदरजंग हॉस्पिटलने केलेला नाही. त्यांचे म्हणणे आहे की, तापात पॅरासिटामॉलच्या शिवाय ज्या लोकांना श्वास घेण्यास समस्या येत आहे त्यांना श्वसन समस्या असणाऱ्या रुग्णांप्रमाणेच औषध दिले जात आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे श्वसन रोग विशेषज्ञ सांगतात की, आतापर्यंत केरळच त्यांच्याकडे एकमेव उदाहरण आहे. जेथे या आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा आरोग्य बिघडण्याची शक्यता कमी आहे. या आजाराचा मनुष्याच्या शरीरावर काय परिणाम होतो, हे अद्याप माहित नाही.

Leave a Comment